मोताळा मार्गावर 'दुधगंगा'! दुग्धजन्य पदार्थांचा अभिषेकही...

 
मोताळा
मोताळा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): होय! मोताळा परिसरात असं आक्रीत अन विपरितच घडलं! त्यामुळे रस्त्यावर जणू दुधाची नदी वाहती की काय असा धवल भास बघ्यांना झाला... आता हे वाचून वाचक म्हणतील की आता 'लाइव्ह' ने काय भानगड आणली बाबा! पण ही भानगड बिनगड नसून खरंच असं झालया अन असा नजारा अनेक तास दिसून आला. आता जास्त न ताणता सांगायचं झालं तर हे बंद एका अपघातानं झालं! 
त्याच झालं असं की, जळगाव खान्देश येथल्या अमर डेअरीचे वाहन मोताळा नजीक आलं. आणि ( बहुधा टायर बर्स्ट झाल्याने) भरवेगात त्यानं एक, दोन, नव्ह तीन पलटी खाल्या. यानंतर 'खाली मुंडक वर पाय ' असं होऊन ते रस्त्यावर उलट झोपल. यामुळे गाडीची मोडतोड होऊन मालाची नासाडी लै लै नासाडी झाली. मोताळा क्रीडा संकुल नजीकच्या वळणावर आज शनीचर ला संध्याकाळी ४ ला ह्यो अकॅसिडेंट घडला. ह्यात चालक अन दुसऱ्या माणसाले झमकावून मुका मार लागला. बोराखेडी स्टेशनच्या पोलीस दादांनी दप्तरामधी घटनेची नोंद केली.