Amazon Ad

दुसरबीडमध्ये पिण्याच्या पाण्याचे वांदे! महिन्याभरापासून गावकऱ्यांचे उपोषण, प्रशासनाचे दुर्लक्ष..

 
दुसरबीड (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीडमध्ये पिण्याच्या पाण्याचे वांदे झाले असून महिनाभरापासून ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसले आहेत. सिंदखेडराजा तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीला पिण्याचे पाणी व वापरायचे पाण्याचे नियोजन झाले नसल्याने जिल्हा प्रशासनाच्या नियोजनावर सवाल उपस्थित केल्या जातोय.
 बुलढाणा जिल्ह्याचे तापमान ४३ डीग्रीच्या वर गेले असून प्रचंड उकाडा जाणवत आहे. इतक्या उकाड्यात दुसरबीडवासी पाण्यासाठी उपोषणाला बसले त्यामुळे प्रशासनाने यावर विशेष लक्ष देवून पाणी टंचाईचा प्रश्न सोडवावा अशी मागणी करण्यात येत आहे. शिवाय पावसाळ्यापूर्वी नाल्यांची साफसफाई करावी, शहराला नियमित नळाद्वारे पाणी मिळावे अशा विविध मागण्या संदर्भात ग्रामस्थांचे उपोषण सुरू आहे. मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यातील बहुतांश जलसाठ्यात वाढ झालेली नाही. यामुळे जिल्हावसियांना दमदार पावसाची प्रतीक्षा लागून आहे. अनेक ठिकाणी भीषण पाणी टंचाई असल्याचे चित्र आहे.