डॉ. सुनील कायंदे मित्रमंडळाची अशीही सामाजिक बांधिलकी...

विशालच्या कुटुंबियांना दिली २ लाख रुपयांची मदत
 
file photo
सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गोपीनाथगडावरून परतताना १८ वर्षीय तरुणाचा मृत्‍यू झाला होता. त्‍याच्‍या कुटुंबियांना दोन लाख रुपयांची मदत देऊन डॉ. सुनील कायंदे मित्रमंडळाने मोठा आधार दिला आहे.
आंबेवाडी (ता. सिंदखेड राजा) येथील विशाल रामप्रसाद सानप हा गोपीनाथ गडावरून परतताना हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू पावला होता. गोपीनाथ गडावरुन नतमस्तक झाल्यानंतर १२ डिसेंबरला ही घटना घडली होती. डॉ. सुनील कायंदे मित्रमंडळाने एक लाख रुपये बहिणीच्या नावे व एक लाख रुपये घर बांधण्यासाठी दिले आहेत. यावेळी भाजपचे डॉ. सुनील कायंदे, पंचायत समिती उपसभापती बद्री बोडखे, माजी सरपंच शंकर जायभाये, विलास बोंद्रे, प्रवीण कायंदे, बबन सानप, अविनाश नागरे, गणेश आंधळे, योगेश डिगोळे, गणेश कायंदे आदी उपस्थित होते.