"मराठीत" सांगितलेलं कळत नाय? बुलडाण्यात ४४० पोरांनी मराठीच्या पेपरला मारली दांडी...
Fri, 3 Mar 2023

बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): काल,२ मार्चपासून वर्ग १० वीच्या बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात झाली. बुलडाणा जिल्ह्यातील १५३ केंद्रावर ही परीक्षा होत असून ३९ हजार ६८४ विद्यार्थ्यांनी परीक्षेचा फॉर्म भरलेला आहे.
दरम्यान, काल झालेल्या पहिल्याच मराठीच्या पेपरला तब्बल ४०० विद्यार्थ्यांनी दांडी मारली. मराठी मातृभाषा असली असल्याने १०० टक्के विद्यार्थी हजर राहतील अशी शक्यता होती. मात्र सोप्या पेपरची सुद्धा काहींना भीती वाटली की काय? किंवा मराठीचा पेपर असल्याचे मराठीत सांगितल्याचे ४०० जणांना कळले नाही काय? असा मजेशीर प्रश्न उपस्थित झालाय. ३९ हजार २८४ विद्यार्थ्यांनी पेपरला हजेरी लावली.