भर रस्त्यात बायकोसोबत कुणी असं करत का? बुलडाण्यातील मलकापूर रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर नवऱ्याने बायकोसोबत नको नको ते केलं...बायकोची पोलिसांत तक्रार
Dec 12, 2023, 12:57 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात ३८ वर्षीय विवाहित महिलेने धाव घेत तक्रार दिली. विवाहितेने स्वतःच्या नवऱ्याच्या विरोधात तक्रार दिली. अतुल रामदास घाडगे असे आरोपी नवऱ्याचे नाव आहे. बुलडाणा शहरातील मलकापूर रोडवर असलेल्या रिलायन्स पेट्रोल संपासमोर नवऱ्याने तिच्यासोबत जो व्यवहार केला ,त्यावरून संतप्त झालेल्या विवाहितेने थेट पोलिस ठाणे गाठले.
तक्रारदार विवाहिता छाया अतुल घाडगे(३८,रा.अण्णा भाऊ साठे नगर,बुलडाणा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार घटना १० डिसेंबरची आहे. विवाहिता मूळची चिखलीची असली तरी गेल्या ३ वर्षांपासून कामधंद्यासाठी पतीसह बुलडाण्यात येऊन राहते. दरम्यान दोघा पती पत्नीत घरघुती कारणावरून वाद होते. या वादातून विवाहितेचा पती दोन्ही मुलांना घेऊन चिखली येथे राहण्यासाठी गेला होता. दोघांच्या घरघुती वादाचे प्रकरण सध्या महिला तक्रार निवारण कक्षात सुरू आहे
घटनेच्या दिवशी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास विवाहिता हॉटेल द्वारका वरील मजुरी काम आटोपून घरी परत जात होती. त्यावेळी विवाहितेच्या पतीने रिलायन्स पेट्रोल पंपासमोर तिला गाठले. पतीने तिला गाडीवर बसायला सांगितले असता तिने नकार दिला. याचा राग आल्याने पतीने पत्नीला अश्लील भाषेत शिवीगाळ केली. हातातील कड्याने बायकोच्या कपाळावर मारहाण केली. हात पिरगाळला, चापटा बुक्क्यांनी मारहाण केली, गळा देखील दाबला . तुला एखाद्या दिवशी जीवाने मारून टाकीन अशी धमकी दिली असे विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून पोलिसांनी विवाहितेच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.