विश्व संवाद केंद्राचा जिल्हास्तरीय महर्षी नारद सन्मान पत्रकार अरुण जैन आणि गजानन धांडे यांना! घाटाखालील भागातून मोताळ्याचे गणेश राठी आणि शेगावचे राजेश चौधरी सन्मानाचे मानकरी!

उद्या भाईजींच्या हस्ते होणार गौरव
 
Bdbdb
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विश्व संवाद केंद्राच्या वतीने देण्यात येणारा महर्षी नारद जयंती निम्मित देण्यात येणार महर्षी नारद पत्रकारिता सन्मान जाहीर झाला आहे. यंदा हा सन्मान घाटावरील जिल्ह्यातून दैनिक सकाळचे जिल्हा प्रतिनिधी अरुण जैन तसेच महाराष्ट्र टाइम्स आणि दैनिक हिंदुस्थानचे जिल्हा प्रतिनिधी गजानन धांडे यांना देण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या घाटाखालील क्षेत्रातून लोकमतचे मोताळा तालुका प्रतिनिधी गणेश ऊर्फ पप्पू राठी व शेगावचे देशोन्नती तालुका प्रतिनिधी राजेश चौधरी या सन्मानाचे मानकरी ठरले आहेत.
उद्या, दिनांक ९ जुलै रोजी विश्व संवाद केंद्राच्या वतीने आयोजित महर्षी नारद जयंती कार्यक्रमात हा सन्मान करण्यात येणार आहे. दुपारी साडेतीनला बुलडाणा शहरातील गर्दे वाचनालय येथील स्व.भास्करराव देशपांडे कक्षात हा कार्यक्रम होणार आहे. बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष भाईजी चांडक या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत तर नागपूर येथील ज्येष्ठ पत्रकार संजय तिवारी यांचे प्रमुख उद्बोधन होणार आहे. व्हॉईस ऑफ मिडीयाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के पाटील यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन विश्व संवाद केंद्राच्या वतीने प्रचार प्रमुख अभिजीत कुळकर्णी आणि प्रशांत देशपांडे यांनी केले आहे.