जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांची बदली! बुलडाण्याला मिळाले नवे जिल्हाधिकारी; डॉ.किरण पाटील नवे जिल्हाधिकारी

 
Jdj
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दहाच महिन्यांत बुलडाणा जिल्ह्याला पुन्हा नवे जिल्हाधिकारी पहायला मिळत आहेत. दहा महिन्यांपूर्वी बुलडाणा जिल्हाधिकारी म्हणून कारभार स्वीकारणाऱ्या डॉ. ह.पी तुम्मोड यांची बदली करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्याला आता नवे जिल्हाधिकारी मिळाले आहेत. तुम्मोड यांच्या जागेवर डॉ. किरण पाटील जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून रुजू होणार आहेत.
डॉ. तुम्मोड यांचा कार्यकाळ समाधानकारक राहिला आहे. अतिशय साधी राहणी मात्र कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून डॉ. तुम्मोड यांनी मिळवली होती. त्यांची आता मुंबईत बदली करण्यात आली आहे. मुंबई विकास आयुक्त असंघटित कामगार या पदावर ते रुजू होणार आहेत. त्यांच्या जागेवर डॉ.किरण पाटील रुजू होत आहेत. डॉ. पाटील यांनी याआधी मंत्रालयात मुख्य सचिवांच्या कार्यालयात उपसचिव म्हणून काम सांभाळले आहे. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द गाजलेली आहे. लवकरच ते बुलडाणा जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.