अण्णाभाऊ साठे यांची जयंतीनिमित्त लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण! समाज कल्याण सहाय्यक आयुक्त अनिता राठोड यांच्या हस्ते वितरण

 
dkkd

बुलडाणा(जिमाका):साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या कार्यालयात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पंण करण्यात आले. तसेच जयंतीनिमित्त थेट कर्ज योजनेंतर्गत लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले.

समाजकल्याण, सहाय्यक आयुक्त अनिता राठोड, जात पडताळणी समितीचे मनोज मेरत यांच्या हस्ते थेट कर्ज योजनेंतर्गत तीन लाभार्थींना प्रत्येकी ८५ हजार रूपयांचा धनादेश वितरीत करण्यात आला. तसेच अनुदान योजनेंतर्गत तीन लाभार्थीना प्रत्येकी १० हजार रूपयांच्या अनुदानाचे धनादेश वितरीत करण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे दोन धनादेश वितरीत करण्यात आले.

यावेळी समाज कल्याण वरिष्ठ निरीक्षक श्री. धर्माधिकारी, महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस. व्ही कापरे, महादेव विद्यागर, विजय जाधव, उत्तमराव बाजड, वामन लोखंडे, अश्विनी हिवाळे, उमेश पांडे, संदिप कपले, गणेश कपले, हरिदास रावळकर, सागर रावळकर, सचिन सोनोने, महेंद्र वाघ, सतिश बाहेकर, विजय शिंदे, स्वप्नील क्षिरसागर, मयूर जाधव उपस्थित होते.

जिल्हा व्यवस्थापक एम. एस. धांडे यांनी सूत्रसंचालन केले. एस. बी. गौड  यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी रेखा मोरे यांनी पुढाकार घेतला.