दिशा महिला बचतगट फेडरेशनची कार्यशाळा उत्साहात! जयश्रीताई शेळके म्हणाल्या, महिला बचतगटांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी

 
bachat gat

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनसोबत जिल्ह्यातील १४०० बचतगट संलग्न आहेत. महिला बचतगटांच्या उत्पादनांची गुणवत्ता दर्जेदार असल्याने बाजारपेठेत त्यांना मागणी आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्याचे काम महिला बचतगटांच्या माध्यमातून केले जात असल्याचे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष जयश्रीताई शेळके यांनी केले. 

bachat gat

दिशा बचतगट फेडरेशनच्यावतीने ९ ऑक्टोबर रोजी आयोजित कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. महानायिकांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यशाळेला प्रारंभ झाला. कार्यशाळेत सहभागी बचतगटांना रेकॉर्ड वाटप करण्यात आले. महिलांना रेकॉर्ड भरण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. तळणी येथील भारत महिला बचतगटाला १ लक्ष ५० हजार रुपयांचे भांडवल उपलब्ध करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष माधुरीताई देशमुख, माजी सरपंच श्रद्धाताई मामलकर, लतिकाताई गायकवाड यांची उपस्थिती होती. 

jahirat

जाहिरात 👆

कार्यशाळेला भारत महिला बचत गट मोताळा, संत रोहिदास महिला बचतगट वडगाव, जिजामाता महिला बचतगट तिघ्रा, सावित्री महिला बचतगट तिघ्रा, माँ संतोषी महिला बचतगट मोताळा,  श्री स्वामी समर्थ बचतगट, दिव्या महिला बचतगट मोताळा,  रमाई महिला बचत गट वडगाव, महालक्ष्मी महिला बचत गट मोताळा, अण्णा भाऊ साठे महिला बचतगट मोताळा, भीमाई महिला बचतगट तालखेड, राजमाता महिला बचतगट बोराखेडी, साई महिला बचतगट मोताळा, जगदंबा महिला बचतगट मोताळा, भीमाई महिला बचतगट तालखेड, महालक्ष्मी महिला बचतगट पलढग,  टिपू सुलतान महिला बचतगट बोराखेडी, जय लहूजी महिला बचतगट खरबडी,  वात्सल्य महिला बचतगट मोताळा,  साई महिला बचतगट मोताळा,  जय वळेखन महिला बचतगट तळणी, सविधा महिला बचतगट घुस्सर, जीवनविद्या महिला बचतगट मोताळा, राजरत्न महिला बचतगट तालखेड, मिराई महिला बचतगट तालखेड, विघ्नहर्ता महिला बचतगट तालखेड,  उन्नती महिला बचतगट अंत्री, प्रकाश महिला बचतगट घुस्सर,सावित्री महिला बचतगट अंत्री, सर्वज्ञ महिला बचतगट तालखेड, भारतरत्न महिला बचतगट तालखेड, गौतमी महिला बचतगट शेलापुर,  सावित्रीबाई फुले महिला बचतगट वडगाव, शिव महिला बचतगट पून्हई,  नम्रता महिला बचतगट शेलापुर, दर्शिक महिला बचतगट घुस्सर, प्रियांशी महिला बचतगट तळणी, कार्तिक महिला बचतगट मोताळा,  संघर्ष महिला बचतगट पून्हई,  आंबेडकर महिला बचतगट डिडोळा, प्रसाद महिला बचतगट बोरखेडी, अमन महिला बचतगट बोराखेडी, उमंग महिला बचतगट मोताळा, आनंद महिला बचतगट तालखेड, मुस्कान महिला बचतगट बोराखेडी आदी बचतगटांच्या महिला उपस्थित होत्या.