घाणेरडेपणा..! केरळात पत्नींची अदलाबदल करणारे रॅकेट!!; दुसऱ्या लोकांबरोबर संबंध ठेवण्यासाठी पतीचाच होता दबाव; उच्चभ्रू लोकांचे कारनामे

 
file photo
तिरुअनंतपुरम ः केरळ राज्यातून एक विचित्र, धक्कादायक आणि किळसवाणा प्रकार समोर आला आहे. शारीरिक संबंध ठेवण्यासाठी पत्नीची अदलाबदल करणारे मोठ रॅकेट केरळ पोलिसांनी उघडकीस आणले आहे. माझा पती मला दुसऱ्या लोकांबरोबर संभोग करण्यासाठी भाग पाडतो, अशी तक्रार एका महिलेने पोलिसांत केली होती. त्यानंतर पोलिसांनी खोलात शिरून तपास केल्यावर हा घाणेरडा प्रकार समोर आला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या रॅकेटमध्ये तब्बल एक हजार लोकांचा समावेश होता. यासाठी व्हाॅट्स ॲप आणि मेसेंजरवर ग्रुप तयार करण्यात आले होते. हजबंड वाइफ एक्स्चेंज रॅकेटमध्ये सामील असलेल्या सात जणांना पोलिसांनी केरळमधील कोट्टायम् येथून अटक केली आहे. चांगन चेरीचे डेप्युटी एसपी आर. श्री. यांनी याबद्दल सांगितले, की आधी लोक व्हॉटस् अप आणि टेलिग्रामच्या माध्यमातून ग्रुपमध्ये समाविष्ट होत होते. नंतर एकमेकांना भेटायचे.

याप्रकरणात एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरून तिच्या पतीला अटक करण्यात आली. तो त्याच्या पत्नीला दुसऱ्या पुरुषाशी सबंध ठेवायला जबरदस्ती करत होता. या बदल्यात त्याला त्या दुसऱ्या पुरुषाची पत्नी उपभोगायला मिळणार होती. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या रॅकेटमध्ये अडकलेले बहुतांश लोक हे उच्चभ्रू म्हणवल्या जाणाऱ्या वस्तीतील रहिवासी आहेत. केरळच्या अलापुझ्झा, कोट्टायम आणि एर्नकुलम या शहरांतील उच्चभ्रू लोक या रॅकेटचा भाग असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.