देवेंद्र मिसाळ झाले भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष!

 
jdjjd
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ येथील देवेंद्र मिसाळ यांची भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड झाली आहे.
 

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप खंडापुरकर, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पंडित तिडके यांनी घेतलेल्या निवड समितीच्या बैठकीत देवेंद्र मिसाळ यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेऊन त्यांची बुलडाणा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.