देऊळगाव घुबे वासियांनी अनोख्या पद्धतीने जपल्या शहीद अग्निवीर जवान अक्षय गवतेंच्या स्मृती! अक्षयच्या मामाचे गाव आहे देऊळगाव घुबे...

 
Hxhcn
देऊळगाव घुबे( ऋषिकेश भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई येथील वीर जवान अक्षय गवते सियाचिन मध्ये कर्तव्यावर असताना शहीद झाले होते. वीर जवान अक्षय गवतेंच्या अंत्यसंस्काराला पिंपळगाव सराईत जनसागर उसळला होता. दरम्यान आता अक्षयच्या मामाचे गाव असलेल्या देऊळगाव घुबे वासियांकडून वीर जवान अक्षयच्या स्मृती अनोख्या पद्धतीने जपल्या जाणार आहेत.
 देऊळगाव घुबे गाव शहीद जवान अक्षयच्या मामांचे गाव आहे. त्यामुळे बालपणी तसेच अनेक सणांच्या निमित्ताने अक्षयची देऊळगाव घुबे गावाशी जवळीक होती. आज वीर जवान अक्षयच्या स्मृती म्हणून देऊळगाव घुबेत गावकऱ्यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष विष्णू घुबे, माजी सरपंच अशोक घुबे, गणेश घुबे, प्रवीण घुबे, फकिरबा घुबे, माजी सरपंच दिपक घुबे, विलास हरिभाऊ घुबे, परमेश्वर घुबे, माजी सरपंच संजय मुजमले, गणेश घुबे, शिवाजी घुबे, साहेबराव जंजाळ आदी उपस्थित होते.