बुलडाण्यात सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन! असतील काही तक्रारी निपटून घ्या; त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात या...
Sep 30, 2023, 20:55 IST
बुलडाणा(जिल्हा माहिती कार्यालय ): दर महिन्यात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार ऑक्टोबर २०२३ महिन्याचा लोकशाही दिन मंगळवार, दि. ३ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.
तक्रारदारांनी लोकशाही दिनी उपस्थित राहावे, उपस्थित राहणे शक्य नसल्यास तक्रारी रजिस्टर पोस्टाने लोकशाही दिनाआधी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचतील अशाप्रकारे पाठवाव्यात, असे निवासी उपजिल्हाधिकारी शरद पाटील यांनी कळविले आहे.