ठरल! बुलडाणा येथे होणाऱ्या शासकीय कृषी महाविद्यालयाला स्व. भाऊसाहेब फुंडकरांचे नाव! यंदापासूनच प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता; प्रथम वर्षासाठी ६० विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश ​​​​​​​

 
dfghjk
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मोठ्या प्रतीक्षेनंतर बुलडाण्यात शासकीय कृषी महाविद्यालय होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. २८ जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शासकीय कृषी महाविद्यालयाच्या प्रस्तावास मान्यता मिळाली. त्यानंतर काल,१३ जुलैला शासनाने यासंदर्भातील निर्णयाचे पत्रक काढले.
 

२०१६ -२०१७ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तत्कालीन अर्थमंत्र्यांनी बुलडाण्यात कृषी महाविद्यालय स्थापन करण्याची घोषणा केली होती. २८ जुलै २०२३ च्या मंत्रिमंडळ बैठकीस बुलडाण्याच्या शासकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव मंजूर झाला. शासकीय कृषी महाविद्यालयासाठी ३० हेक्टर  जमिनीची आवश्यकता आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी संशोधन आणि विज्ञान केंद्राच्या  कार्यक्षेत्रातील १३० हेक्टरपैकी ३० हेक्टर जमीन यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

gvhg   

                              जाहिरात
दरम्यान शासनाने काढलेल्या पत्रकानुसार यंदा म्हणजेच २०२३ -२०२४ च्या शैक्षणिक सत्रापासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. प्रथम वर्षाकरिता यंदा ६० विद्यार्थ्यांचा प्रवेश होणार आहे. या महाविद्यालयाचे नाव " भाऊसाहेब फुंडकर शासकीय कृषी महाविद्यालय बुलडाणा" असे राहणार असल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे. या महाविद्यालयासाठी ४५ शिक्षक वर्गीय व ४३ शिक्षकेतर पदे निर्माण करण्यासाठी सुद्धा मान्यता देण्यात आली आहे.
  

शिक्षकांचा पगार व इतर खर्चासाठी १४६ कोटी ५४ लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. आवश्यक मनुष्यबळ व इतर पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यानंतर प्रवेश प्रकिया राबविण्यात येणार आहे.