ठरलं..! ना.प्रतापराव जाधवांचा बुलडाणेकर करणार नागरी सन्मान; तारीख ठरली...
Updated: Jun 22, 2024, 21:33 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्याचे भूमिपुत्र केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधव यांचा नागरी सत्कार सोहळा बुलडाणेकरांनी आयोजित केला आहे. ३० जूनला रविवारी सकाळी १० वाजता हा सोहळा होणार आहे.
सलग चौथ्यांदा खासदार म्हणून विजयश्री प्राप्त केल्यानंतर प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्याकडे आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार देण्यात आला शिवाय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आरोग्य मंत्रालयाच्या राज्यमंत्री पदाची देखील जबाबदारी त्यांच्याकडे आहे. जिल्ह्याच्या भूमिपुत्राचा देशपातळीवर हा सन्मान होत असल्याने समस्त बुलडाणेकरांना याचा अभिमान आहे. त्यामुळे ना.प्रतापराव जाधव यांचा नागरी सन्मान व्हावा या उद्देशाने आज, २२ जूनला बुलडाणा शहरातील विश्रामगृहावर बैठक आयोजित करण्यात आली होती. नागरी सन्मान सोहळ्याच्या समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते पत्रकार राजेंद्र काळे यांची नियुक्ती करण्यात आली. ३० जूनला हा सन्मान सोहळा होणार आहे. कार्यक्रम भव्यदिव्य करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.