बुलडाण्यात धरणे, मोताळ्यात जमिनीत गाढून घेतले! आदिवासी कोळी बांधव आक्रमक! म्हणाले जिल्हाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली, आता तर आम्ही...

 
Aandol
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी आदिवासी कोळी महादेव समाजाकडून मागील १८ दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. दरम्यान आज १९ जानेवारीला आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून आले. बुलडाणा शहरात धरणे , तर मोताळा तालुक्यातील पलढग येथे जमिनीत गाढून घेत आंदोलनाला सुरुवात झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला चर्चेसाठी आजची वेळ दिली होती, मात्र त्यांनी पाठ फिरवल्याचा आरोप आंदोलक करत आहेत. जोपर्यंत जिल्हाधिकारी भेटणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा इशारा पलढग येथील आंदोलकानी दिला आहे. तेथील गंगाधर तायडे यांनी स्वतःला शिरापर्यंत पर्यंत जमिनीत गाढून घेतले आहे.
मागील काही दिवसांपासून आदिवासी कोळी महादेव समाज बांधवांची आंदोलन तीव्र स्वरूपात रूपांतर होताना दिसले. मध्यंतरी आंदोलकांनी बुलढाण्यातील बीएसएनएल टॉवरवर चढून, तसेच रस्तारोखून सरकार विरोधी निदर्शने केली. अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे. संपूर्ण राज्यभर हे आंदोलन ठिकठिकाणी सुरू आहे. बुलढाणा येथे सुरू असलेल्या उपोषणाला दिवसेंदिवस वेगळे वळण पाहायला मिळाले. आज बुलडाणा येथे धरणे सुरू असतानाच एका आंदोलकाची प्रकृती खालावली. त्यावेळी समाजातील जिल्हाभरातील महिला तसेच शाळकरी मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.