बुलडाण्यात मराठा हॉटेलसमोर राडा - राडा! नेंमक काय झालं..?

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून दोन टवाळखोर तरुणांनी एका मित्रासह दोघांना मारहाण केली. इतकेच नाही तर डोक्यात वार करून जखमी केले. ही घटना सोमवार २४ जूनच्या रात्री १२:३० वाजता चिखली रोडवरील हॉटेल मराठा समोर घडली. 
याबाबत, मनीष भगवान ठोंबरे (२४ वर्ष) याने बुलढाणा पोलिसात तक्रार दिली, मनीष हा चिखली येथील रहिवासी असून तो चायनीजचे दुकान चालवितो. २४ जून रोजी त्याचा मित्र अक्षय गवई हा त्याला बुलढाण्यात भेटला. मराठा हॉटेल बाहेर दोघे उभे असताना, अक्षयचा मित्र एका जणासोबत तिथे आला होता. 'दारू पिण्यासाठी पैसे दे' असे अक्षयच्या मित्राने त्याला म्हटले. अक्षय ने पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांनी शिवीगाळ केली. लोटपाट केली. अक्षयच्या मित्रासोबत असलेल्या दुसऱ्या मुलाने जवळ येवून ' तू कुठे राहतो असे म्हणत मनीष ठोंबरे याच्याशी वाद घातला. लाता बुक्क्यांनी मारहाण करत चाकू सारख्या वस्तूने डोक्यात वार केले. यात मनीषच्या डोक्याला दुखापत झाली. त्याने आरडाओरड केल्याने मारहाण करणारे दोघे लगेचच फरार झाले.
    त्यानंतर मनीष हा मित्र अक्षयला घेवून शहर पोलीस ठाण्यात पोहोचला. त्यानंतर त्याला उपचारासाठी सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. मारहाण करणाऱ्या दोघांपैकी एक अक्षयचा मित्र असल्याने दोघांचेही नाव कळाले. शुभम पुरी व रिंकू पेंटर असे त्या टवाळखोरांचे नाव असल्याचे समजले. पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल रामकला सुरभे ह्या करीत आहेत.