बुलडाण्यात स्मशानभूमीच्या वॉचमनला मारहाण ! दोघांविरुद्ध गुन्हा दाखल...

 
Dolyat
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): स्मशानभूमीचे गेट लवकर उघडत का नाही? असे बोलून येथील त्रिशरण चौकातील हिंदू स्मशानभूमीच्या वॉचमनला मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
यासंदर्भात वॉचमन देवानंद इंगळे यांनी शहर ठाण्यात तक्रार दिली. २१ फेब्रुवारीला रात्री ९ वाजेच्या सुमारास कर्तव्यावर असताना त्रिशरण चौकातील हिंदू स्मशानभूमी गेट समोर सतीश गायकवाड आणि त्याच्यासह एक अनोळखी युवक दारू पिऊन आला. स्मशानभूमी चे गेट उघड असे म्हणाले असता , इंगळे यांनी थोड्यावेळ थांबा उघडतो असे म्हटले, गेट लवकर उघडले नाही या कारणावरून दोघांनी वाद घालायला सुरवात केली. सतिष गायकवाड याने हातातील कडे त्यांच्या गालावर मारले, त्याच्या सोबतच्याने लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.देवानंद इंगळे यांना जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली. असे तक्रारीत म्हटले आहे. त्यांनतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन दोघांविरुद्ध तक्रार नोंदविली. पोलिसांनी सतीश गायकवाड आणि त्याच्या सहकाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत.