गोशाळेतून गोधन चोरीला ! हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

 
देऊळगाव राजा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा ) देऊळगाव राजा येथील गुगळा देवी परिसरातील गोशाळेतून गोधन चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. यासंदर्भात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाली असून गोधनाचा शोध लावावा, दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनता पक्ष व हिंदुत्ववादी संघटनेने कडून करण्यात आली आहे....
शनिवारी रात्री श्रीकृष्ण गोशाळा गोकुळादेवी मंदिर परिसरातून सात गाई व एक वळू चोरीला गेले होते. अज्ञात चोरट्याने कत्त्लीसाठी गोधन चोरी केले, असा संशय व्यक्त करण्यात आला. गोधनाचा शोध घेण्यात यावा, चोरट्यांना अटक करावी, कायदेशीर कठोर स्वरूपाची कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
देऊळगाव राजा पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष महल्ले यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपचे ओबीसी नेते डॉ सुनिल कायंदे ,जिल्हा सचिव डॉ शंकर तलबे, शहर अध्यक्ष संजय तिडके, नगर संघचालक ॲड.पुरुषोत्तम धन्नावत, गायत्री परिवाराचे जन्मन व्यवहारे , प्रविण धन्नावत , मनिष अग्रवाल, शिवसेनेचे सचिन व्यास ,गोशाळेचे अध्यक्ष राजेश तायडे, संचालक आदर्श गुप्ता, ॲड अर्पित मीनासे, भरत कुऱ्हे , किशोर पटेल, गणेश मिनासे, अविनाश भावसार, भाजपा युवामोर्चाचे सुरज हनुमंते, महेश मुळे, आशीष भालेराव, सुनिल काटकर, सुरज गुप्ता,मल्हार वाजपे,लखन कुंटे, बाळू धावणे सुनिल श्रीरंगम आदी उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून गोधन चोरीच्या घटना वाढत असल्याचे दिसत आहे. समृद्धी महामार्गावर काही दिवसांपूर्वी तशीच एक घटना उघडकीस आली होती. पोलीस प्रशासनाने याकडे विशेष लक्ष द्यावे, असे निवेदनातून म्हटले आहे.