अंजनी बुद्रूकमध्ये कोरोनाचा रुग्‍ण!

 
कोरोना जाता जाईना… आणखी ५ रुग्‍णांची भर!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 24 नोव्‍हेंबरला कोरोनाचा एक पॉझिटिव्‍ह रुग्‍ण आढळला आहे. मेहकर तालुक्यातील अंजनी बुद्रूकमध्ये हा रुग्‍ण आढळला. दिवसभरात दोन रुग्‍णांना रुग्‍णालयातून सुटी देण्यात आली आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 195 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 194 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 1 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील चाचणीमधील 1 अहवालाचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 89 तर रॅपिड टेस्टमधील 105 अहवालांचा समावेश आहे. आजपर्यंत 736099 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86955 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 42 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 87644 कोरोनाबाधित रुग्ण असून, सद्यःस्थितीत कोविडचे 14 बाधित उपचार घेत आहेत. आजपर्यंत 675 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.