कोरोना अपडेट ः आणखी ५२ बाधितांची भर!; उपचार घेणाऱ्यांचा आकडा २३१ वर

 
corona
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 11 जानेवारीला कोरोनाचे 52 पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत. त्‍यामुळे सध्या उपचार घेणाऱ्यांचा आकडा 231 वर गेला आहे. गेल्या 24 तासांत 3 रुग्णांना डिस्‍चार्ज देण्यात आला आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 875 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 823 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 52 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळा चाचणीमधील 25 व रॅपिड अँटिजेन चाचणीमधील 27 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 150 तर रॅपिड टेस्टमधील 673 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्ह आलेले अहवाल
बुलडाणा शहर :31, देऊळगाव राजा शहर :1, देऊळगाव राजा तालुका : गिरोली बुद्रूक 1, अंढेरा 1, मलकापूर शहर : 4, लोणार तालुका : पिंपळनेर 2, लोणार शहर :1, जळगाव जामोद तालुका : वाडी खुर्द 1, सिंदखेड राजा तालुका : साखरखेर्डा 1, मेहकर तालुका : डोणगाव 1, चिखली शहर :4, चिखली तालुका : हातणी 1, खामगाव शहर :2, संग्रामपूर तालुका : दुर्गदैत्य 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 52 नवीन रुग्ण समोर आले आहेत.

एकूण बाधितांचा आकडा 87911 वर
आजपर्यंत 754090 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 87004 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 966 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 87911 कोरोनाबाधित रुग्ण असून, सद्यःस्थितीत कोविडचे 231 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत.  आजपर्यंत 676 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.