लोणार तालुक्‍यातील या गावात आढळला कोरोना रुग्‍ण!

 
corona
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 12 नोव्‍हेंबरला कोरोनाचा एक रुग्‍ण समोर आला असून, तो लोणार तालुक्‍यातील पार्डा दराडे येथील आहे. उपचारानंतर दोघे बरे झाले असून, त्‍यांना डिस्‍चार्ज देण्यात आला. त्‍यामुळे सध्या 6 रुग्‍ण उपचार घेत आहेत.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 306 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 305 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 1 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये रॅपिड अँटिजेन चाचणीमधील एका अहवालाचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 189 तर रॅपिड टेस्टमधील 116  अहवालांचा समावेश आहे. आजपर्यंत 733578 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86943 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 28 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87623 कोरोनाबाधित रुग्ण असून, आजपर्यंत 674 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.