बुलडाणा, शेगावमध्ये आढळले कोरोना रुग्ण!; उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या १६ वर!!

 
corona
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरातील महावीरनगरमधील 1 आणि शेगाव शहरातील जुन्या महादेव मंदिराजवळील 1 असे 2 नवे कोरोनाबाधित रुग्ण जिल्ह्यात आज, 1 जानेवारीला समोर आले आहेत. जिल्ह्यात सध्या एकूण 16 बाधित सध्या उपचार घेत आहेत. आजपर्यंत 676 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 398 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 396 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 2 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळा चाचणीमधील 2 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 215 तर रॅपिड टेस्टमधील 181 अहवालांचा समावेश आहे.

आजपर्यंत 748025 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86986 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 403 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87678 कोरोनाबाधित रुग्ण असून, आजपर्यंत 676 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.