बुलडाणा, शेगावमध्ये आढळले कोरोनाबाधित!

 
corona

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहराजवळील सागवनमध्ये एक आणि शेगाव शहरातील रेणुकानगरात एक असे एकूण दोन कोरोनाबाधित आढळले आहेत. सध्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या 12 वर गेली आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 176 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 174 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 2 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील चाचणीमधील 2 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 24 तर रॅपिड टेस्टमधील 150  अहवालांचा समावेश आहे. आजपर्यंत 734351 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86943 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 104 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 87629 कोरोनाबाधित रुग्ण असून,आजपर्यंत 674 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.