ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाच्यावतीने संविधान दिनाचे आयोजन

 
Jdjx
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाच्यावतीने २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात येणार आहे. राजर्षी शाहू टॉवर शेजारील सेठी प्लाझामध्ये सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष सुनील शेळके राहणार आहेत. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुनय लाड, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा समन्वयक प्रमोद टाले, ऍड. सुभाष विणकर, शाहीर के. ओ. बावस्कर, संघटनेचे राज्य सल्लागार डॉ. शिवशंकर गोरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष किशोर पवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.