डीवायएसपीपदी निवड झालेल्या भाग्यश्री धिरबस्सीच्या पालकांचा सत्कार! ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाच्यावतीने मंडल दिन साजरा

 
satkr

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करुन डीवायएसपीपदी निवड झालेल्या भाग्यश्री धिरबस्सी हिच्या पालकांचा ७ ऑगस्ट रोजी सत्कार करुन ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाच्यावतीने मंडल दिन साजरा करण्यात आला.

ओबीसी मुक्तीचा जाहीरनामा असलेला मंडल आयोग ७ ऑगस्ट १९९० रोजी लागू करण्याची घोषणा लोकसभेत करण्यात आली. या दिवसाला उजाळा देण्यासाठी समस्त ओबीसी समाजबांधवांनी राज्यभरात मंडल दिन उत्साहात साजरा करावा, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष सुनील शेळके यांनी केले होते. शासकीय, निमशासकीय सेवेत निवड झालेले उमेदवार, विविध परीक्षेत उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा सत्कार करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाच्यावतीने राज्यात ठिकठिकाणी मंडल दिन साजरा करण्यात आला.

बुलडाणा येथे डीवायएसपी पदी निवड झालेल्या भाग्यश्री धिरबस्सी हिच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे राज्य मार्गदर्शक डॉ. शिवशंकर गोरे, जिल्हाध्यक्ष किशोर पवार, प्रसिद्धी प्रमुख विठ्ठल इंगळे, संघटनेचे महासचिव राम वाडीभस्मे ,तालुकाध्यक्ष गजानन पडोळ, गजानन राऊत, संजय खांडवे यांची उपस्थिती होती.