संभ्रम दुर झाला! जिल्ह्यात ईद-ए -मिलाद २९ सप्टेंबरला होणार साजरी! पवित्र बरेली येथुन आले आदेश; सिकंदर मैलाना यांनी सांगितलं कारण...! मेहकरच्या माजी नगराध्यक्षांनी मुस्लिम बांधवांना केले "हे" आवाहन...

 
nkfdfldfgdflk

मेहकर( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांची जयंती ईद-ए-मिलाद म्हणून साजरी केली जाते. मोहम्मद पैगंबर हे अल्लाहचे अंतिम प्रेषित आहे. इस्लामच्या धारणेनुसार अल्लाहने त्यांच्या मार्फत कुराण हा धर्मग्रंथ लोकांपर्यंत पोहोचवला. त्यामुळे त्यांना नबी, रसूल आदी नावांनीही संबोधित केले जाते. इस्लाम मध्ये ईद-ए-मिलाद हा सर्वांत मोठा दिवस असल्याचे मानले जाते. त्या दिवशी मोहम्मद पैगंबर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. आजपासून हिंदु बांधवांचा गणपती बाप्पा चा सण सुरू आहे. हिंदू आणि मुस्लिम या दोघांचा अनंत चतुर्दशी व ईद-ए-मिलाद २८ तारखेला आल्याने प्रशासनाची चांगली तारांबळ उडाली होती. परंतु  उलमा -ए - अहलेसन्नतच्या निर्णयामुळे प्रशासनाच्या डोक्यावरचव ताण मिटला आहे . सगळ्या मुस्लिम समाजासाठी पवित्र असलेल्या बरेली येथील धर्मगुरूंनी एका पत्राद्वारे कळविले आहे की जिथे चंद्र दिसला नाही त्यांनी २९ तारखेला ईद-ए-मिलाद साजरी करावी असे मौलाना सिकंदर यांनी सांगितले आहे. 

add

 सिकंदर मौलाना ,हाजी कासम गवळी ,तोफिक कुरेशी, शेखलाल  कुरेशी,जब्बार कुरेशी , यांच्या सह मुस्लिम समाजातील प्रमुख नेत्यांनी पोलीस प्रशासना सोबत बैठक झाली व सांगितले की, "आमच्या धर्मगुरूंनी ईद २९ तारखेला साजरी करण्याचे सांगितले आहे व हिंदू बांधवांचे गणपती विसर्जन हे २८ तारखेला आहे या करीता प्रशासनाच्या डोक्यावरील फार मोठे ताण मिटला आहे. दोन्ही मोठे सण उत्साहा साजरे होणार या करीता या बैठकीसाठी अप्पर पोलीस अधीक्षक बि.बि महामुनी , उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे शिवसेनेचे शहर प्रमुख जयचंद बाठीया, समाधान सास्ते आदी मान्यवर उपस्थित होते.

 हाजी कासम गवळी म्हणाले....

सर्व मुस्लिम बांधवांनी ईद ए मिलाद हा सण उत्साहात साजरा करावा. ईद-ए-मिलाद हा सण २९ तारखेला रोज शुक्रवारला साजरा करावा असे आदेशपत्र पवित्र बरेली येथून मेहकर येथील मौलाना सिकंदर यांना प्राप्त झाले आहे. तरी जिल्ह्यातील सर्व मुस्लिम बांधवांनी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करावा, परंतु डीजे मुक्त उत्साहात साजरा करावा असे आवाहन मेहकरचे माजी नगराध्यक्ष हाजी कासम गवळी यांनी केले आहे.