शोकसंदेश! बुलडाण्यात उद्या सरकारचा दशक्रियाविधी! आदिवासी महादेव कोळी समाजबांधवांनी छापली अजब पत्रिका...सोशल मीडियावर व्हायरल..

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महादेव कोळी समाज बांधव आपल्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी आक्रमक झालेत. २ जानेवारीपासून बुलडाण्यात अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. काल,९ जानेवारीला काही आंदोलकांनी टॉवर वर चढून आंदोलन केले होते तर समाजबांधवांनी रास्ता रोको सुद्धा केला होता. आता आंदोलनाचे पुढचे पाऊल उचलण्यात आले असून उद्या सरकार आणि प्रशासनाचा दशक्रियाविधी करण्यात येणार आहे. त्यासाठी "शोक संदेश" या मथळयाखाली छापण्यात आलेली पत्रिका सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे..
Ghube
                          जाहिरात 👆
आदिवासी महादेव कोळी जमातीला जात प्रमाणपत्र व आरक्षण देण्याची समाजाची मागणी आहे. सरकार आंदोलनाची दखल घेत नसल्याने सरकार मेलेले असल्याचे जाणवत असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे. त्यामुळेच उद्या सरकारचा दशक्रियाविधी करण्यात येणार आहे. उद्या ,दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे अनोखे आंदोलन होणार आहे.