१५ ते १८ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना कोविड लसीकरणाला प्रारंभ

 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः कोविड या साथरोगावर कायमस्वरुपी नियंत्रण मिळविण्यासाठी 5 ते १८ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना आजपासून कोरोना लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला. जिल्हा सामान्य रुग्णालयात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त पंधरा ते अठरा वर्षे वयोगटासाठी कोरोना लसीकरणाची सुरुवात झाली. पहिली लस कु. सिद्धी राजेश डिडोळकर हिने घेतली.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा मनिषाताई पवार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र सांगळे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भागवत भुसारी, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. सचिन वासेकर आदी उपस्थित होते. जिल्ह्यात 26 लसीकरण सत्र ठिकाणी आज लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यात 15 ते 18 वर्षे वयोगटात ग्रामीण भागात 10 लक्ष 9 हजार 937 व शहरी भागात 29 हजार 616 असे एकूण 13 लक्ष 9 हजार 553 लाभार्थ्यांना लसीकरण करावयाचे आहे. आज दुपारी 4.30 वाजेपर्यंत 2000 लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले. प्रशासन उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी प्रयत्न करीत असून त्यासाठी नियोजन केले आहे.