वाघजाई फाटा ते जळगाव रस्त्याचे अपूर्ण काम पूर्ण करा! सरपंच बसले आमरण उपोषणाला...

 
सिंदखेड राजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) सिंदखेड राजा तालुक्यातील वाघजाई फाटा ते जळगाव या रस्त्याचे अपूर्ण काम पूर्ण करा या मागणीसाठी वाघजाई सरपंच गजानन शिवाजी सानप तसेच ग्रामस्थांनी काल १९ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण सुरू केले.
वाघजाई ग्रामपंचायत कार्यालयात काल पासून बेमुदत उपोषणाला सुरुवात झाली. तत्पूर्वी २९ सप्टेंबर २०२३ बांधकाम विभागाकडून ग्रामपंचायतला रस्त्याचे अपूर्ण काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन मिळाले होते. मात्र पूर्तता झाल्या नसल्याने वाघजाई सरपंच गजानन सानप यांनी बेमुदत उपोषण पुकारले. निकृष्ट दर्जाच्या झालेल्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अभियंत्यावर योग्य कार्यवाही व्हावी अशीही मागणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थ मंडळीं बेमुदत उपोषणास बसले आहेत.