जिल्हाधिकारी दीर्घ सुटीवर! धनंजय गोगटे यांच्याकडे अतिरिक्त (प्र)भार!!

 
file photo
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः  बुलडाण्याचे जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती दीर्घ सुटीवर गेले असून, या महत्त्वपूर्ण पदाचा प्रभार अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

शांत, संयमी अशी ओळख निर्माण करणारे एस. रामामूर्ती हे येत्या १७ जानेवारीपर्यंत सुटीवर गेले आहेत. त्यांचा प्रभार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्याकडे की अतिरिक्त जिल्हाधिकारी गोगटे यांच्याकडे सोपविण्यात येतो, याबद्दल महसूलसह जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळात उत्सुकता होती.

मात्र अखेर ही आव्हानात्मक जबाबदारी ॲडिशनल कलेक्टर धनंजय गोगटे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. महसूल विभागातील एक अभ्यासू ,अनुभवी अधिकारी म्हणून श्री. गोगटे हे परिचित आहेत. कोरोनाने डोके वर काढले असताना व ओमिक्रॉनची धास्ती वाढली आहे. यामुळे कडक निर्बंध, मिनी लॉकडाऊनची शक्यता असताना काहीशा आव्हानात्मक परिस्थितीत त्यांच्याकडे हा प्रभार आला आहे.