बुलडाणा शहरातील मोकाट जनावरांना पकडण्यासाठी नगर परिषदेची विशेष मोहीम !
Updated: Feb 21, 2024, 12:36 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा शहरात सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या मोकाट जनावरांचा योग्य बंदोबस्त लावण्यासाठी नगर परिषदेने काल मंगळवार ,२० जानेवारीपासून विशेष मोहीम सुरू केली आहे.
गुरेढोरे, श्वान, घोडे यासारखी जनावरे सार्वजनिक ठिकाणी आढळल्यास नगरपरिषद आरोग्य विभागाच्या वतीने त्यांना वाहन पिंजऱ्यात अटकाव करण्यात येणार आहे. मोहिमेत दहा कर्मचाऱ्यांचे एक चमू असणार असून वाढण्याची शक्यता आहे.विल्हेवाटेसाठी जनावरांना नगरपरिषदेच्या कोंडवाड्यात ठेवण्यात येणार असून नगर परिषदेच्या मागील जागेत जीर्ण अवस्थेत असणाऱ्या कोंडवाड्याची डागडुजी करण्यात आली आहे. सोबतच चिखली रोडवरील गौशाळेत गायिंची सुरक्षितता ठेवण्यात येणार असल्याचे नगर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
अनेकवेळा शहरातील चौका चौकात ठाण मांडून बसणाऱ्या मोकाट जनावरांमुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होते. त्यामुळे ही मोहीम उपयुक्त ठरणार आहे.
नगरपरिषदेचे आवाहन!
मालकीची जनावरे आपल्या स्वतः च्या जागेत ठेवावे. त्यामुळे ही मोहीम करण्यात अडचण निर्माण होणार नाही. तसेच मोकाट जनावरांचा योग्य बंदोबस्त होईल. असे आवाहन मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी केले आहे.