महिनाभरापासून चिखली - वाघोळा बिबी बससेवा ठप्प ! शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना ऐन थंडीत करावा लागतो पायीप्रवास.. चिखली आगार प्रमुखांचे दुर्लक्ष

 
Dhnc
चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : चिखली तालुक्यातील वाघाळा गावातील विद्यार्थ्यांना सावखेड येथे शाळेत जाण्यासाठी पायी प्रवास करावा लागत आहे. गत महिन्यांपासून चिखली बीबी वाघोळा बससेवा बंद असल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास भोगावा लागतो. वारंवार चिखली आगार प्रमुखांकडे तक्रार देऊनही अधिकाऱ्यांनी दुर्लक्षित केले असल्याचे सांगण्यात आले आहे.
विध्यार्थी सावखेड नागरेतील श्रीमती प्रभावती काकू शिंगणे विद्यालयात शिक्षण घेत आहेत. शाळेत जाण्यासाठी वाघाळा येथून चिखली आगाराची बस लागते.प्रवासासाठी महामंडळाची पास असतानाही ऐन थंडीच्या दिवसांत चिमुकल्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान त्या मार्गाची बससेवा ठप्प झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. तत्पूर्वी वारंवार तक्रार देऊनही चिखली आगार प्रमुखांनी दुर्लक्षित केले असल्याचे सांगण्यात आले आहे.