मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "व्वा व्वा छान.."! प्रख्यात निवेदक गणेश धुंदळे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप..

 
Ganesh dhundale
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली शहरात १३ जानेवारीला राज्याचे मुख्यमंत्री ना. शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसंकल्प कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. मेळाव्याला हजारो पदाधिकारी तसेच जिल्हाभरातील शिवसेना नेते हजर होते. चिखलीचे पत्रकार तथा प्रख्यात निवेदक गणेश धुंदळे यांनी प्रभावी संचालन केले. दरम्यान कार्यक्रम आटोपल्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी गणेश धुंदळे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
गणेश धुंदळे गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहेत. याबरोबरच ते उत्कृष्ट निवेदक देखील आहेत. जिल्ह्यातील विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांचे सूत्र संचालन होत असते. शिवसंकल्प सभेचेही बहारदार सूत्रसंचालन त्यांनी केले. मुख्यमंत्री नियोजित वेळेपेक्षा उशिरा आले मात्र तरीही आपल्या कौशल्याच्या जोरावर गणेश धुंदळे यांनी जनसमुदायाला खिळवून ठेवले.धुंदळे यांच्या सूत्रसंचालनाच्या शैलीने मुख्यमंत्री शिंदेही प्रभावित झाले. "व्वा व्वा.. छान संचालन करता तुम्ही..शुभेच्छा" अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी गणेश धुंदाळे यांचे कौतुक केले.