मुख्यमंत्र्यांची वेळ चुकली! लोक वाट पाहून पाहून थकले, काही झोपले..

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. नियोजित कार्यक्रमानुसार १२ वाजून २० मिनिटांनी मुख्यमंत्री चिखली तालुक्यातील इसरुळ येथे पोहचणार होते. 

मात्र वेळ उलटून सुद्धा मुख्यमंत्री पोहचले नाहीत. मुख्यमंत्र्यांना मुंबईतून बाहेर पडायलाच उशीर झाला, त्यामुळे मुख्यमंत्री कार्यक्रमस्थळी पोहचायला नियोजित वेळेपेक्षा दीड  तास उशीर लागणार असल्याचे समजते. दरम्यान मुख्यमंत्री येणार असल्याने मोठी गर्दी कार्यक्रमस्थळी झाली आहे. अनेक जण मुख्यमंत्र्यांची वाट पहात पहात झोपी गेल्याचे दिसून आले.