चिखलीत आज संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवराज्यभिषेक दिनाचा सोहळा! मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

 
chshivajimaharaj
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळा अर्थात हिंदुसाम्राज्य दिन सोहळा आज,६ जून रोजी चिखली येथे संपन्न होत आहे. आज सायंकाळी ठीक साडेसहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा सोहळा संपन्न होत आहे. पत्रकार, लेखक कृष्णा सपकाळ या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.
 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाला यंदा ३४९ वर्ष पूर्ण होत असून आगामी वर्ष ३५० वे वर्ष म्हणून देशभर साजरे करण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चिखली  नगराच्या वतीने या हिंदुसाम्राज्य दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला शिवप्रेमी नागरिकांसह माता भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.