"त्या" अपघातातील भक्तिसाठी सरसावले सारथी मित्र! भक्तीवर छत्रपती संभाजीनगरात सुरू आहेत उपचार; १५ लाख रुपयांची आहे गरज! आपणही वाचवू शकता भक्तीचे प्राण, अशी करा मदत..

 
xys
रायपूर(सादिक शाह: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  चिखली मेहकर रस्त्यावर  १ एप्रिल च्या सायंकाळी नांद्रा धांडे फाट्याजवळ एक भीषण अपघात झाला होता. त्यात मोटर सायकल वरील बापाचा जागीच मृत्यू झाला होता तर लेक गंभीर जखमी झाली होती.  गजानन पांडुरंग म्हस्के ,(रा.ब्रह्मपुरी ता .मेहकर) असे  त्या मृतक पित्याचे नाव असून त्यांची लेक कु. भक्ती (१३) ही गंभीर जखमी झालेली आहे. गंभीर जखमी अवस्थेत  भक्तीला छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले होते.
 

सध्या भक्तीवर छत्रपती संभाजीनगरातील एशियन हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे. कु. भक्तीचे वडील  त्याच अपघातात दगावले आहेत, त्यातच  आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्या कारणाने सर्व सामाजिक व्यक्तींनी पुढाकार घेऊन भक्तीला मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  उपचारासाठी १५ लाख रुपयांची गरज आहे. दरम्यान सारथी परिवार जिल्हा बुलडाणा यांनी आपल्या व्हॉट्सॲप ग्रूप च्या सर्व सारथी मित्रांना मदत करण्याचे आवाहन केले होते. दोन दिवसात जी मदत ग्रुपच्या माध्यमातून जमा झाली ती भक्तीच्या उपचारासाठी त्यांच्या घरी आशीर्वाद रूपाने त्यांच्या आई जवळ सुपूर्द करण्यात आली. रोख रक्कम देते वेळी सारथी परिवार चे समाधान पाटील, सादिक शहा, दीपक मोरे , प्रकाश कुटे,  सचिन वाघ,  श्रीराम सोनुने, हमीद भाई, आणि पंकज घा, सामाजिक कार्यकर्ते अमोल पाटील  हिवरा आश्रम,भक्ती चे  काका यांची  उपस्थिती होती.
     
अशी करा मदत...!

madat

 भक्तीला मदत करण्यासाठी फोन पे किंवा गुगल पे ने मदत करता येईल. 9922317678 या फोन पे नंबर वर किंवा 9767670708 या नंबर वर गुगल पे करुन करुन भक्तीला मदत करता येईल. किंवा सदर क्रमांकावर फोन करून सुद्धा आपल्याला मदत कशी करायची याबद्दल विचारणा करता येईल.