राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल

 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सिंदखेड राजा येथे 12 जानेवारीला श्री राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा साजरा केला जाणार आहे. श्री राष्ट्रमाता जिजाऊ जन्मस्थळ व कार्यक्रमाचे जिजाऊ सृष्टी स्थळ हे प्रमुख राज्य महामार्ग क्रमांक 12 वर आहे. यावर्षी कोरोना विषाणू संसर्गामुळे हा सोहळा 50 व्यक्तींच्या उपस्थितीत अटी व शर्तीचे अधीन राहून साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. तरीसुद्धा या सोहळ्यास उपस्थित राहणाऱ्या जनतेच्या सुरक्षेसाठी वाहतुकीस पर्यायी मार्गाने वळविणे क्रमप्राप्त आहे.

मुंबई पोलीस कायद्याचे कलम 33 (1) सह कलम 36 अन्वये बुलडाणा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी बुलडाणा प्रमुख राज्य महामार्ग क्रमांक 12 वरील मालेगाव ते जालना मार्गे सिंदखेडराजा रोडवरील येणारी व जाणारी वाहतूक 11 जानेवारी रोजी मध्यरात्री 12 वाजेपासून ते 12 जानेवारी 2022 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत एक दिवसासाठी पर्यायी मार्गाने वळविली आहे. शासकीय वाहने (केंद्र सरकार, राज्य सरकार) सर्व अति महत्वाच्या व्यक्तींची वाहने, तात्काळ सेवा- रुग्णवाहीका, शववाहिनी, अग्नीशामक दलाची वाहने व जिवनावश्यक वस्तूंची वाहने वगळता सर्व वाहनांसाठी नमुद कालावधी करीता हा आदेश लागु राहील. या महामार्गावर पर्यायी मार्गाकरीता ‘डिव्हीजन प्लॅन’ तयार करण्यात आला आहे. त्यानुसार महामार्गावर वाहतूक वळविण्यासाठी कट ऑफ पॉईंट देण्यात आले आहे.

कट ऑफ पाँईंट व पर्यायी महामार्ग असा...

  • मेहकर उपविभाग - कट ऑफ पॉईंट : मेहकर ते सारंगपूर (सुलतानपूर) रस्त्यावरील बायपास मार्गावर, पर्यायी मार्ग- मालेगाव- मेहकर- चिखली- देऊळगाव राजा-जालना. कट ऑफ पॉईंट : लोणार ते सुलतानपूर येथील सिंदखेड राजा टी पॉईंट, पर्यायी मार्ग- लोणार- मेहकर- चिखली- देऊळगाव राजा- जालना, कट ऑफ पॉईंट : बिबी गावातील मांडवा टी पॉईंट, पर्यायी मार्ग- बिबी- मलकापूर पांग्रा- साखरखेर्डा- लव्हाळा- चिखली- देऊळगाव राजा- जालना, बिबी- मलकापूर पांग्रा- सावखेड नागरे- अंढेरा- देऊळगाव राजा- जालना.
  • देऊळगाव राजा उपविभाग : कट ऑफ पॉईंट : दुसरबीड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ, पर्यायी मार्ग- दुसरबीड-मलकापूर पांग्रा- साखरखेर्डा- लव्हाळा- चिखली- देऊळगाव राजा- जालना, दुसरबीड- मलकापूर पांग्रा- सावखेड नागरे- अंढेरा- देऊळगाव राजा- जालना. कट ऑफ पॉईंट : तढेगाव फाटा येथील लाँग मार्चजवळ, पर्यायी मार्ग- दुसरबीड- तढेगाव- टाकरखेड वायाळ- खैरव- देऊळगाव मही- देऊळगाव राजा- चिखली रस्ता, कट ऑफ पॉईंट : किनगाव राजाजवळ हिवरखेड पूर्णा बसस्टँड टी पाँईंट, पर्यायी मार्ग- किनगाव राजा- हिवरखेड पूर्णा- सावंगी टेकाळे- रेाहणा फाटा- देऊळगाव राजा ते चिखली रस्ता, कट ऑफ पॉईंट : माळ सावरगावजवळ तुळजापूर टी पॉईंट, पर्यायी मार्ग- तुळजापूर फाटा- तुळजापूर- गिरोली खुर्द- देऊळगाव राजा, कट ऑफ पॉईंट : मिस्त्री कोटकर पेट्रोलपंप जालना नाका देऊगळगाव राजा, पर्यायी मार्ग- देऊळगाव राजा- चिखली- मेहकर- मालेगाव, कट ऑफ पॉईंट : नाव्हा रोड जालना टी पॉईंटजवळ, जालना, पर्यायी मार्ग- जालना- दे.राजा- चिखली- मेहकर- मालेगाव असा राहणार आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.