चंदनपुर हत्याकांड अपडेट! बोगस आधारकार्ड बनवून देणाऱ्या दोघांना पुण्यातून उचलले; अल्पवयीन मुलीचा खुन करणाऱ्या जाकीर चे आधारकार्ड निघाले होते बनावट....

 
Ggh
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या चंदनपूर येथे झालेल्या अल्पवयीन मुलीच्या हत्याकांड प्रकरणी मोठी अपडेट समोर आली होती. १३ ऑक्टोबरच्या रात्री अल्पवयीन मुलीचा खून झाल्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी अजयकुमार मालवीय यांच्या मार्गदर्शनाखाली २४ तासांच्या आत अंढेरा पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले होते. आरोपींपैकी एक असलेल्या जाकीर उल दायी चे आधारकार्ड बनावट असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्या दृष्टीने तपासाला सुरुवात केली होती. अटकेतील २ आरोपींची १४ दिवसांची कोठडी मिळवल्यानंतर पोलिसांनी आरोपींना पुण्यात नेले. तिथेच आरोपींचे बनावट आधार कार्ड बनवल्याचे तपासात निष्पन्न झाले. बनावट आधार कार्ड बनवून देणाऱ्या दोघांना आता अंढेरा पोलिसांनी पुण्यातून उचलून आणले आहे.
 गुलाम शेख आईनउल हक (३२, ग्वाईजवाडी, जि मालंदा, पश्चिम बंगाल, ह. मु कोरेगाव पार्क, वेस्टन हॉटेल पुणे ) व मोहम्मद अख्तर आलम अब्दुल कुट्टरा (४०, रा.ग्वाईजवाडी, जि मालंदा, पश्चिम बंगाल) असे बनावट आधारकार्ड प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याआधीच मुख्य आरोपी जाकीर उल दायी आणि त्याचा साथीदार अलीमुद्दीन मियां यांना अटक करण्यात आलेली आहे.