राहेरी बु येथे मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषणाला सुरुवात! मनोज जरांगे पाटलांना गावकऱ्यांचा पाठिंबा; आमदार डॉ.शिंगणे म्हणाले, मनोज जरांगेंची समाजाला गरज,त्यांची काळजी वाटते...

 
hgyg

सिदखेडराजा( बाळासाहेब भोसले:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिदखेडराजा तालुक्यातील राहेरी बु गावामध्ये नेत्यांना गावबंदीसाठी फलक लावण्यात आले असून आमदार खासदार व पुढारी यांना गावबंदी असून विनाकारण आमच्या गावात येऊ नये अशी फलक लावण्यात आले . नेत्यांना गावबंदी करणारे राहेरी बु हे जिल्ह्यातील पहिले गाव ठरले. गावकऱ्यांनी एवढ्यावर न थांबता मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीला बसलेले संघर्ष युद्धा मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून कालपासून  साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे .

 या उपोषणासारखेच आता तालुक्यात सगळीकडे गावोगावी उपोषणे सुरुवात होण्याची शक्यता आहे. राहेरी बु येथील उपोषणासाठी   मनोहर देशमुख, भगवान देशमुख, मदन देशमुख, राजेंद्र देशमुख, सुरेश देशमुख, अरुण देशमुख, विठ्ठल देशमुख, धनंजय देशमुख,  उल्हास देशमुख, आनंद देशमुख, आशिष देशमुख, संदीप देशमुख, कुणाल सरकटे, सुधाकर सरकटे, रामकिसन देशमुख, माणिक देशमुख, बबन देशमुख, विनायक देशमुख, गोपाळ देशमुख ,जनार्दन देशमुख, आशिष देशमुख, प्रमोद देशमुख, बंडू मोरे, प्रकाश मोरे, बबन शिंदे, रवी देशमुख, सुनील देशमुख, दत्ता देशमुख इत्यादी गावकऱ्यांनी  साखळी उपोषणाला सुरुवात केलेली आहे.

डॉ.राजेंद्र शिंगणे म्हणाले..

दरम्यान याविषयावर आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की" मराठा समाजाला टिकणार आरक्षण मिळायला पाहिजे. सरकारने कोणत्याही प्रकारचा विलंब न करता मराठा आरक्षण ताबडतोब द्यावे. मनोज जरांगे यांच्यासारख्या माणसासाठी आमच्या मराठा समाजाला गरज आहे. त्यांची प्रकृती खालावत आहे, आम्हाला त्यांची काळजी वाटते . सरकारने जास्तीची चर्चा न करता मराठा आरक्षण लवकरात लवकर द्यावे. राहेरी बु येथील मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषणाला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे"