BIG BREAKING पोळा घरघुती पद्धतीने साजरा करा, बैलपोळा भरवू नका! नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील धडकी भरवणारा पहिला आदेश; वाचा काय आहे कारण....

 
Ghjgf
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पदभार स्वीकारल्यानंतर पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांचा पहिलाच आदेश धडकी भरवणारा आहे. शेतकऱ्यांचा प्रिय सण असलेला बैलपोळा उद्या शेतकऱ्यांना सार्वजनिक पद्धतीने साजरा करता येणार नाही. तसा आदेशच जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे, अर्थात शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवूनच हा आदेश काढण्यात आला आहे. लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी तसे निर्देश दिले आहेत.

 डॉ. ह.पी. तुम्मोड यांची बदली झाल्यानंतर काल, १२ सप्टेंबरला डॉ.किरण पाटील यांनी बुलडाणा जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. काल त्यांनी विविध विभागप्रमुखांच्या बैठकी घेत त्यांना कामकाजासंदर्भात सूचना दिल्या. दरम्यान त्यांच्या स्वाक्षरीचा पहिला आदेश पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर निघाला आहे.
  

  जिल्ह्यात लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे, गोवंशीय गुरांना त्याची लागण होत आहे. हा संसर्गजन्य आजार असल्याने बैलांना एका ठिकाणी एकत्र आणल्यास त्याचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यामुळे बैलपोळा सार्वजनिक पद्धतीने न भरवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी दिले आहेत. याशिवाय गुरांचे बाजार भरवणे,प्राण्यांची जत्रा भरवणे याकरिता देखील बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याप्रमाणे कारवाई होणार आहे.