जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीची छेड काढल्याचे प्रकरण; योग्य कारवाई न झाल्याने अखेर वैतागलेल्या पिडीत डॉक्टर तरुणीने पोलिसांत दिली तक्रार !
' विशाखा समितीत' दोषी ठरलेल्या डॉ. सोळंके विरोधात समितीने आधीच तक्रार का दिली नाही?
May 30, 2024, 14:08 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) जिल्हा स्त्री रुग्णालयातील भुलतज्ञ डॉक्टर अविनाश सोळंकेने प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीची छेड काढल्याचा संतापजनक प्रकार १४ मे रोजी उघडकीस आला. यासंदर्भात पिडीत डॉक्टर तरुणीने रुग्णालय प्रशासान व जिल्हा शल्य चिकित्सकांकडे तक्रार दिली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पुढील चौकशीसाठी रुग्णालय प्रशासनाकडून विशाखा समिती नेमण्यात आली. यात डॉ. सोळंके हा दोषी सिद्ध झाला होता. यानंतर त्याला निलंबित करण्यात आले होते. परंतु समितीने डॉ. सोळंके विरोधात पोलिसांत तक्रार का दिली नाही? असा देखील सवाल उपस्थित होतोय. दरम्यान, पिडीत डॉक्टर तरुणी आईवडिलांना घेवून छत्रपती संभाजीनगर येथे निघून गेली. डॉ. सोळंकेवर योग्य ती कारवाई झाली नाही. यामुळे संतप्त झालेल्या डॉक्टर तरुणीने काल २९ मेच्या रात्री उशिरा बुलढाणा शहर पोलीस ठाणे गाठून डॉ. सोळंके विरोधात तक्रार दिली. यावरून पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम महाविद्यालयात पिडीतेचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाले. स्त्रीरोगतज्ञ म्हणून तीन महिन्यांसाठी बुलढाणा येथे स्त्री रुग्णालयात प्रशिक्षणासाठी पिडीता कार्यरत होती. यादरम्यानच ११ मेच्या सकाळी ८ वाजतापासून रात्री १२ पर्यंत पिडीता कर्तव्यावर होती. त्यावेळी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास ऑपरेशन थेटरमधून येवून लेबररूम मध्ये रुग्ण तपासण्यासाठी आली. यावेळी डॉ सोळंके याने मेसेज पाठवून पिडीतेला बाहेर येण्याचे सांगितले. सिनियर असल्याने डॉ सोळंके याचे ऐकत पिडीता डॉक्टर बाहेर आली. त्यानंतर डॉ.सोळंके म्हटला, की 'आप गाड़ी में बैठो हमे बाहर जाना है' तेव्हा क्या काम है आप मुझे यही पे बोलो असे पिडीतेने म्हटले. "मी तुम्हाला पसंद करतो मला, तुझ्यासोबत लग्न करायचे आहे" असे सोळंके याने सांगितले. तुम्ही माझे सीनियर आहात, तुम्हाला असे शोभत नाही" असे पिडीतेने म्हटले असता 'मी चांगला माणूस नाही, मी खुप खराब आहे. असे म्हणत डॉ. सोळंकेने पीडित डॉक्टर तरुणीचा वाईट उद्देशाने हात धरला. त्यावेळी तेथून तिने लगेचच पळ काढला. त्यानंतर देखील डॉ सोळंके हा मागे आला व काम करत असताना समोर येऊन बसला. त्यावेळी सुद्धा त्याने हात लावण्याचा प्रयत्न केला. यानंतर सहकारी परिचारिका कर्मचारी यांच्या सोबत बोलतावेळी , मला तिच्याशी काम आहे आहे. असे डॉ. सोळंकी म्हणाला, तेव्हा परिचारिका कर्मचारी म्हणाल्या की, मॅडमच्या सह्या घ्यायच्या आहेत. व खुप रात्र झालेली आहे सर आपण घरी जावे. यानंतर पिडीता डॉक्टर तरुणी सहकारी डॉक्टर सोबत बोलल्यांनतर कोणाला कॉल केला? असे सुद्धा डॉ सोळंकेने विचारले. त्यांनतर तो तेथून निघून गेला. हे, झाल्यानंतर ही सगळी संतापजनक घटना पिडीतेने जिल्हा शल्य चिकित्सक चव्हान, यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना सांगितली. अशी माहिती पिडीत डॉक्टर तरुणीने तक्रारीत दिली आहे.