NEET च्या निकालात करिअर पॉइंट कोटा बुलडाणा आणि चिखली शाखेच्या विद्यार्थ्यांची गरुडझेप! १२ विद्यार्थी होणार एमबीबीएस डॉक्टर, मिळवले ५०० पेक्षा अधिक गुण!

प्रा. भालके आणि प्रा पवार सर, प्रा संतोष दवंड सरांची मेहनत रंग लाई; जिल्ह्यातल्या टॉपरही करिअर पॉइंटचाच! स्वप्नील सोळंकेने मिळवले ५९३ गुण

 
fghj
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  अगदी अल्पावधीत जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक मिळवणाऱ्या करिअर पॉइंट कोटा बुलडाणा आणि चिखली शाखेच्या विद्यार्थ्यांनी काल जाहीर झालेल्या NEET च्या निकालात दमदार बाजी मारली आहे.  तब्बल १२ विद्यार्थ्यांनी ५०० पेक्षा अधिक गुण मिळवले असून जिल्ह्यात सर्वाधिक ५९३ गुण मिळविणारा स्वप्नील सोळंके देखील करिअर पॉइंट च्या यशाचा मानकरी ठरला आहे.

प्रा.डॉ.भालके सर आणि पवार सायन्स क्लासेसचे संचालक प्रा. पवार सर यांच्या संकल्पनेतून बुलडाण्यात करिअर पॉइंट कोटा ची शाखा सुरू झाली. कोटा, दिल्ली आणि उत्तर भारतातील नावाजलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये शिकवण्याचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या प्राध्यापकांची मोठी टीम प्रा. डॉ भालके आणि प्रा. पवार सरांनी उभी केली. जिल्ह्यातल्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांना NEET,JEE या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षांची तयारी करायला महागड्या ठरणाऱ्या लातूर,  छत्रपती संभाजीनगर किंवा परराज्यात जायची गरज पडू नये हा हेतू त्यामागे होता, अगदी अल्पावधीत हा हेतू साध्य झाल्याचे काल, जाहीर झालेल्या निकालात दिसून आहे. १२ विद्यार्थ्यांनी ५०० पेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची एका वर्षांची प्रवेश फी ही "पवार सायन्स क्लासेस"कडून भरण्यात येणार असून  ५९३ गुण मिळवून अव्वल ठरणाऱ्या स्वप्नील सोळंके याच्या पाचही वर्षांची १ लाख रुपयांपर्यंतची फी "डॉ. भालके सर व पवार सर" कडून भरण्यात येणार आहे. करिअर पॉइंटच्या या यशाने त्यांच्यासह यशस्वी विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

   हे आहेत गुणवंत..!

स्वप्नील सोळंके - ५९३ गुण, प्रगती सुसर - ५९२ गुण, धीरज व्यवहारे - ५९० गुण, सोहम जाधव - ५६९ गुण,  गोपाल जगताप - ५६० गुण, दर्शन खुळे - ५५९ गुण, हर्षल मेथे - ५५१ गुण, संकेत सरोदे - ५४८ गुण, प्रांजल किन्होळकर - ५२५ गुण, कार्तिक अंभोरे - 529 गुण आणि आदित्य भोकन - ५१८ गुण, आदित्य सावळे ५१0 गुण या १२ विद्यार्थ्यांनी ५०० पेक्षा अधिक गुण मिळवले आहेत.