वीज कोसळून बैल ठार! किनगावराजा येथील घटना..

 

किनगाव राजा (निलेश डीघोळे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) काल ११ जूनच्या रात्री जिल्ह्यातील विविध भागात मेघगर्जनेसह कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. दरम्यान, रात्री ९ वाजेच्या सुमारास किनगाव राजा येथील एका शेतात वीज कोसळून बैल ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

 किनगाव राजा शिवारात गट क्र. ४८२ मध्ये योगेश सुधाकर चतुर यांची शेती आहे. गुरांच्या गोठ्यासमोर त्यांनी त्यांचा खिल्लार जातीचा बैल बांधून ठेवला होता. परंतु रात्री मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट सुरू झाला. याच दरम्यान, कमी अधिक पावसाची सुरुवात झाली. शेतात वीज कोसळून त्यांच्या बैलाचा जागीच मृत्यू झाला. शासनाने घटनेचा पंचनामा करत मदत करावी अशी अपेक्षा शेतकरी चतुर यांनी व्यक्त केली.