बुलढाणेकर म्हणतात 'ती' सध्या जास्त दिसत नाही, कुठे आढळली तर सांगा! 'या' साठी तुम्हालाही त्रास होत असेल...

 

बुलडाणा (अभिषेक वरपे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ती आधी दारोदार यायची.. त्यामुळे आमचा परिसर स्वच्छ राहत होता. 'ती' येत असल्यामुळे आमच्या प्रभागात कचरा होत नव्हता, कुणी कचरा करत नव्हत.. घरादारातला जमा केलेला कचरा 'ती' घेऊन जायची.. पण आता ती जास्त दिसत नाही ? असे बुलढाणेकर म्हणताएत, आणि दिसत जरी असली तरी अनेक प्रभागात पोहोचत नाही.. अर्थात ज्याविषयी बोलले जातय 'ती' तुमच्या लक्षात आली असेलच. होय नगरपालिकेच्या घंटागाडी बद्दल आपण बोलतोय.. 

   बुलढाणा शहरात आधी प्रत्येक प्रभागात, नगरात घंटागाडी पोहोचायची. नागरिकांनी कचराकुंडीत जमा केलेला ओला व सुका कचरा घंटागाडीत टाकणे सोयीचे होत होते. यामुळे, कचरा इतर कुठेही परिसरात फेकल्या जात नव्हता. प्रभागात देखील स्वच्छता राहत होती. परंतु आता शहरात नगरपालिकेची ही घंटागाडी तुरळक दिसून येत आहेत असे नागरिक सांगतात. 'बनायेंगे स्वच्छ भारत का अभियान हे गाणे घंटागाडीतूनच वाजायचे पण अभियान नगरपालिकेने कमी केले का ? असा सुद्धा यानिमित्ताने प्रश्न होतो. शहरातील कचरा व्यवस्थापनासाठी घंटागाडीचा स्तुत्य उपक्रम काही वर्षांपूर्वी नगर पालिका प्रशासनाच्या वतीने सुरू आहे. तो आताही सुरू आहेच, परंतु बुलढाणाकर म्हणतात आधी जशी गल्लोगल्लीत घंटागाडी यायची आता तसे दिसत नाही. काही प्रभागात येत असेल पण काहींमध्ये घंटागाडी पोहोचत नाही. त्यामुळे कचऱ्याचे व्यवस्थापन लावण्यासाठी नागरिकांची दमछाक होते. सुंदरखेड, सागवान यासह शहरातील काही प्रभागांमध्ये घंटागाड्या तुरळक प्रमाणात दिसून येतात. परिणामी परिसरात कचरा होत असल्याने आरोग्याचा देखील गंभीर प्रश्न समोर येतो. कचरा व्यवस्थापनाचा उपक्रम नगर पालिका सुरळीत करणार काय ? हे भविष्यात दिसेलच.