जम्मू-कश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा बुलढाण्यात निषेध! (उबाठा) शिवसेनेने काळे झेंडे दाखवून केली निदर्शने;

सरकार विरोधी घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणला...
 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : देशांतर्गत काही राज्यांमध्ये ज्वलंत प्रश्न निर्माण झालेले असताना त्याकडे कानाडोळा करणारे केंद्र सरकार दहशतवादी हल्ले रोखण्यातही अपयशी असल्याचे समोर येत आहे. जम्मू कश्मीर मध्ये झालेला दहशतवादी हल्ला हा निंदाजनक असून केंद्र सरकारने या संदर्भात वेळीच पावले उचलणे आवश्यक आहेत. असे बोलून या हल्ल्याचा शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने तीव्र निषेध करण्यात आला. आज १८ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी झेंडे दाखवून सरकार विरोधी निदर्शने केल्या गेली. 
  Add
याप्रसंगी तालुकाप्रमुख लखन गाडेकर म्हणाले, जम्मु - काश्मीर मधील डोडा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी भारतीय सैनिकांवर हल्ला केला. या हल्ल्यात कॅप्टन ब्रिजेश थापा, नायक डी राजेश यांच्यासह २ जवान शहीद झाले. या हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात बुलडाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालया समोरील चौकात तीव्र निषेध करण्यात येत आहे.
यावेळी शेकडो शिवसैनिकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दहशतवादी हल्ले रोखण्यास केंद्र सरकार अपयशी ठरत आहे. काश्मीर है हिंदुस्थान का, नाही किसी के बाप का, हिंदुस्थान जिंदाबाद , केंद्र सरकार निषेध असो निषेध असो या घोषणा देत काळे झेंडे दाखवून शिवसैनिकांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
 
  यावेळी उपतालुका प्रमुख विजय इतवारे, ओमप्रकाश नाटेकर, संजय गवळी, किसान सेना उप जिल्हा प्रमुख गजानन उबरहंडे, आशिष बाबा खरात, युवासेनेचे उप जिल्हा प्रमुख डॉ अरुण पोफळे, श्याम खडके, सरपंच रामेश्वर बुधवत, भगवान नरोटे, समाधान जाधव, राहुल जाधव, दुर्गादास नाटेकर, उमेश नाटेकर, शफीक बागवान, अमोल जुमडे, अशोक महाराज, अनिल राणा, संभाजी शिंदे, वीरेंद्र बोर्डे, सचिन मिसाळ, सचिन पाटील, रामेश्वर शिंदे, बबन खरे, मधुकर महाले, श्रीनाथ इंगळे, रामेश्वर शिंदे, सोमनाथ शिरसाठ, शिववसिंग कवाळ, महादू गायकवाड यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.