धनगर आरक्षणासाठी उद्या बुलडाणा बंद! पोलिसांच्या तगड्या बंदोबस्तात निघणार मोर्चा!

 
Bhdjf
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) धनगर आरक्षणासाठी उद्या सोमवार,१२ फेब्रुवारीला धनगर समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासह समाज बांधवांनी बुलडाणा जिल्हा बंदची हाक दिली आहे. मागील कित्येक दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नंदू लवंगे यांच्या नेतृत्वात आमरण उपोषण सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर सकल धनगर समाजाकडून बुलडाणा बंदची हाक देण्यात आली.
अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी ठिकठिकाणी धनगर समाजाच्या वतीने आंदोलने सुरू आहेत. बुलडाण्यात आमरण उपोषण सुरू आहे. उपोषणाच्या समर्थनात उद्या शहरात मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामध्येच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दलाकडून मोठी खबरदारी घेण्यात आली आहे. पोलिसांचा तगडा बंदोबस्त यावेळी राहणार आहे. 
असा राहणार बंदोबस्त.. ! 
दरम्यान पोलीस दलाकडून तगडा बंदोबस्त लावण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामध्ये एक अतिरिक्त पोलीस अधीक्षक, ३ उपविभागीय पोलिस अधिकारी, १० पोलीस निरीक्षक,२५ सहाय्यक व पोलीस उपनिरीक्षक,३०० कर्मचारी,१०० महिला कर्मचारी,२ आरसिपी तसेच ३ स्ट्रायकिंग पथक दाखल करण्यात येणार आहे.