योग साधनेला बुलडाणेकरांचा भक्कम प्रतिसाद! जागतिक योगदिनानिमित्त "वन बुलडाणा मिशन"तर्फे जिल्ह्यातील ११ ठिकाणी शिबिरे; संदीप शेळकेंनी सहकुटुंब घेतला सहभाग

 
ss

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जागतिक योगदिनानिमित्त वन बुलडाणा मिशनच्यावतीने २१ जून रोजी जिल्ह्याभर योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले. शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आरोग्याबाबत जिल्हयातील नागरिक सजग असल्याचे दिसून आले. 

 स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी नियमितपणे योग साधना करणे आवश्यक आहे. याच उद्देशाने वन बुलदणा मिशनअंतर्गत बुलडाणा, मेहकर, जळगाव जामोद, संग्रामपूर, सिंदखेडराजा, लोणार, शेगाव, देऊळगाव राजा, चिखली, मोताळा याठिकाणी योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले. तज्ञ योग शिक्षकांनी शिबिरात सहभागी झालेल्या नागरिकांना योगाचे धडे दिले. बुलढाण्यात येडाई लॉन्स येथील शिबिरात राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीपदादा शेळके, राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या अध्यक्षा मालतीताई शेळके, गार्गी शेळके यांनी सहभागी होत योगसाधना केली. योग प्रशिक्षक डॉ. वैशाली निकम, डॉ. कावेरी सावळे, ज्ञानदा काळे, आर्या भवर, क्षितिज निकम, सोमांश सावळे, शैलेश काकडे, पृथ्वी राजपूत यांचे सहकार्य लाभले.योग माणसांना आपसात जोडून परस्पर प्रेम आणि सद्भावतेची भावना विकसित करतो. जागतिक योग दिन साजरा करण्यामागचा हाच उद्देश आहे. जात, धर्म, पंथ  भेदभाव विसरुन सर्वजण एकत्र येतात. ही योगाची ताकद आहे.

योगदिनाच्या संकल्पनेचा जगाने केला स्वीकार
 
२७ सप्टेंबर २०१४ रोजी जनरल असेंब्लीमधील भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना सर्वप्रथम मांडली होती. ११ डिसेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने जाहीर केले की २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवस किंवा जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जाईल. २०१५ पासून, जगभरात २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे.

संदीप शेळके म्हणाले..

जागतिक योगदिनानिमित्त वन बुलढाणा मिशनतर्फे जिल्ह्यातील ११ ठिकाणी योगशिबिरे घेण्यात आली. सर्वच ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बुलढाण्यातील योगशिबिरात सहकुटुंब सहभाग घेत योगसाधना केली. योगामुळे मन प्रफुल्लित होऊन स्फूर्ती मिळाली.