दहावीच्या निकालात बुलडाण्याच्या पवार सायन्स क्लासेसचा डंका! SCIENCE आणि MATHS मध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवणारे पुष्कळ विद्यार्थी! निकाल वाचून तुम्ही म्हणाल,शाब्बास पोरांनो!

यशस्वी निकालावर पवार सर म्हणाले, "हा निकाल अपेक्षितच होता, कारण....

 
Hdjdj
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मार्च एप्रिल मध्ये झालेल्या वर्ग १० वीच्या परीक्षेचा निकाल आज २ मे रोजी जाहीर झाला. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी बुलडाण्याच्या "पवार सायन्स क्लासेसच्या" विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार SCIENCE आणि MATHS या विषयांत ९ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत.
बुलडाण्याच्या पवार सायन्स क्लासेसने शैक्षणिक क्षेत्रात मोठा नावलौकिक मिळवला आहे. दरवर्षी शेकडो विद्यार्थी १० वीच्या निकालात चांगले गुण मिळवतात. SCIENCE आणि MATHS विषयाची परिपूर्ण तयारी पवार सायन्स क्लासेसकडून करून घेण्यात येते. प्रत्येक विद्यार्थ्याकडे व्यक्तिगत लक्ष देऊन तयारी करून घेतल्यामुळे पवार सायन्स क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी निकालात बाजी मारली आहे. आज संध्याकाळपर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार SCIENCE विषयात ३ विद्यार्थ्यांनी तर MATHS विषयात ६ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत. SCIENCE विषयात ११ विद्यार्थ्यांना ९९ गुण मिळाले आहेत. अनेक विद्यार्थ्यांचे निकाल अद्याप क्लासेसच्या संचालकांना प्राप्त होण्याची प्रक्रिया सुरू असल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, पवार सायन्स क्लासेसचे संचालक प्रा. पवार सर यांनी गुणवंतांचे अभिनंदन केले आहे. क्लासेसच्या संचालकांनी विद्यार्थ्यांकडून वर्षभर करून घेतलेली तयारी, विद्यार्थ्यांनी केलेला प्रामाणिक अभ्यास यामुळे हा निकाल अपेक्षितच होता अशी प्रतिक्रिया प्रा. पवार सरांनी दिली आहे. 
 हे आहेत गुणवंत
SCIENCE 100/100
शिवमणी गायकवाड 
 विकिराज साळवे
 ओम गोती
MATHS 100/100
शिवमणी गायकवाड
नीरज पिसे
हर्षदा जेवूघाले 
यश पांढरे
भाग्यश्री तायडे
शिवानी शेळके