Amazon Ad

बुलडाण्याच्या "पहेल इन्स्टिट्यूट" चा NEET च्या निकालात डंका! पहिल्याच बॅचचे ७ विद्यार्थी होणार डॉक्टर! निकाल वाचून तुम्ही म्हणाल, शाब्बास पोरांनो..

 
बुलडाणा(वाणिज्य प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): प्रचंड इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास असला की अशक्य असं काहीच नसत..याचा प्रत्यय दोन वर्षाआधी बुलडाण्याच्या शैक्षणिक क्षेत्रात एन्ट्री करणाऱ्या पहेल इन्स्टिट्यूट ने दाखवून दिलाय. पहेल इन्स्टिट्यूट च्या पहिल्याच बॅचचा NEET या वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षेचा निकाल दणदणीत लागला असून पहिल्या बॅचचे ७ विद्यार्थी डॉक्टर होणार आहेत.

डॉक्टर, इंजिनिअर होण्यासाठी आता बुलडाणा सोडून दुसरीकडे  शिकायला जायची गरज नाही हेच या  निकालाने दाखवून दिले आहे. आपल्या मातीत आणि आपल्या माणसांच्या सानिध्यात राहून देखील घवघवीत यश संपादन करता येते हे पहेल इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिलं आहे. १२ वी बोर्ड, CET नंतर आता NEET परीक्षेच्या निकालात देखील पहेल इन्स्टिट्यूट जिल्ह्यात अव्वल ठरल्याचा दावा इन्स्टिट्यूट च्या संचालकांनी केला आहे.आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार पायल रोकडे - ५६८ गुण, वैष्णवी देशमुख - ५६० गुण, तुषार पालकर - ५५८ गुण, जान्हवी गोरे -५१५ गुण , श्रेया भुसारी - ५१२ गुण, उमेश परिहार - ४९३ गुण, पवन सरकटे -४८९ गुण, रोशन श्रीवास -४८४ गुण, सृष्टी सावळे - ४७३ गुण, राही व्यवहारे - ४६५ गुण आणि दिव्या खर्चे -४३० गुण या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

 दरम्यान " बुलढाणा सारख्या लहान शहरातून हे निकाल आम्ही काढू शकतो हीच मोठी गोष्ट आहे. आमच्या टीमचे सातत्य व त्यांच्या मेहनतीमुळेच हे शक्य झाले. बुलडाण्यात नीट परीक्षेची तयारी होत नाही, याला छेद देत आम्ही हे यश खेचून आणले आहे अशी प्रतिक्रिया पहेल इन्स्टिट्यूट चे संस्थापक संचालक प्राध्यापक निखिल श्रीवास्तव यांनी दिली आहे.
   
पहेल इन्स्टिट्यूटच्या घवघवीत यशासाठी श्री. सिध्देश्वर मंडळकर , प्रा. प्रविण रोकडे , प्रा. अर्जुन पंडीत , प्रा. आर. आर. शेख सर , प्रा. सचिन सर , श्री चेतन प्रधान सर , तेजस्वीनी चौधरी मॅडम , सौ. नयन इंगळे मॅडम , अबोली खंडारे मॅडम , श्री नामदेव हीवाळे , श्री राहुल भादणे , श्री दिलीप डोंगरदिवे , श्री राजु गायकवाड , श्री शुभम भोसले आदींनी फार मेहनत घेतली. या प्रसंगी पहेल इन्स्टिट्यूट चे  सहसंचालक प्रा. डॅा. राजेश्वर उबरहंडे व सौ. विद्या अरविंद पवार यांनी यशस्वी विद्यार्थी व "टिम पहेल"चे कौतुक करत भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. महत्वाची सूचना: पहेल इन्स्टिट्यूट साठी वर्ग ११ वी ची नवीन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे..त्यासाठी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करता येईल..! 9763009156,
9766924900